jos buttler instagram
क्रीडा

Jos Buttler Sixes: 6,6,6,6,6, जोस बटलरकडून USA च्या गोलंदाजांची धुलाई; पाहा सलग 5 षटकारांचा VIDEO

Jos Buttler 5 Sixes Video: इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलरने हरमीत सिंगच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ५ षटकार ठोकले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरची बॅट चांगलीच तळपली. बारबाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात जोस बटलरने २१८ धावांच्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने अमेरिकेचा फिरकी गोलंदाज हरमीत सिंगची चांगलीच धुलाई केली. त्याने या गोलंदाजाच्या एकाच षटकात ५ षटकार खेचत ३२ धावा कुटल्या. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या स्पर्धेतील ५० व्या सामन्यात इंग्लंड आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने अमेरिकेचा एकतर्फी धुव्वा उडवत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. यासह इंग्लंडचा संघ हा सेमिफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. या सामन्यात बटलरने अमेरिकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. त्याने ९ व्या षटकात ५ षटकार खेचले.

तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना अमेरिकेकडून १६ वे षटक टाकण्यासाठी हरमीत सिंग गोलंदाजीला आला होता. त्यावेळी पहिल्या चेंडूवर फिल सॉल्टने १ धाव घेत जोस बटलरला स्ट्राईक दिली. त्यानंतर जोस बटलरने हरमीतच्या सलग ४ चेंडूंवर ४ षटकार खेचले. पुढच्या चेंडूवर हरमीत सिंगने दबावात येऊन वाईड चेंडू टाकला. शेवटच्या चेंडूवरही बटलरने षटकार खेचला. यासह टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच षटकत ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलग ६ षटकार खेचले होते.

यासह ३२ धावा खर्च करणाऱ्या हरमीत सिंगच्या नावे देखील नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील एकाच षटकात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत इंग्लंडचा माजी खेळाडू स्टूअर्ट ब्रॉड अव्वल स्थानी आहे. ब्रॉडने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ३६ धावा खर्च केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT