Jhulan Goswami Record Saam Tv
Sports

Cricket: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत झुलनं गाेस्वामीनं नाेंदविला दूसरा विक्रम

इंग्लंड संघ १५ षटकात २ बाद ५९ धावांवर खेळत आहे.

Siddharth Latkar

माऊंट माऊनगनुई : महिला क्रिकेटमध्ये २५० गडी बाद करण्याचा विक्रम भारतीय महिला क्रिकेट संघातील गाेलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या नावावर आज (बुधवार) नाेंदविला गेला. येथे सुरु असलेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेत झुलनने इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉंटला (Tammy Beaumont) बाद करून ही कामगिरी केली. (icc womens world cup latest marathi news)

या (cricket) स्पर्धेतील आजच्या सामन्यात इंग्लंडने (England) भारतास (India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. भारताचा डाव १३४ धावांतच गुंडाळला गेला. जिंकण्यासाठी १३५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघातील दाेन फलंदाजांना भारतीय गाेलंदाजांनी संघाच्या अवघ्या चार धावांतच पॅव्हेलियन दाखविले. यामध्ये झूलनने इंग्लंडच्या टॅमीस बाद करीत महिला क्रिकेटमध्ये २५० गडी बाद करण्याचा विक्रम नाेंदविला.

दरम्यान याच स्पर्धेत झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) सर्वाधिक बळी घेण्याच्या गुणसंख्येची नुकतीच बरोबरी केली हाेती. गोस्वामीनं ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टनची बराेबरी केल्यानं तिच्यावर काैतुकाचा वर्षाव झाला हाेता. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या (australia) लिन फुलस्टनच्या ३९ बळींच्या संख्येशी गाेस्वामीनं बरोबरी साधली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT