World Cup: १३५ धावांचे आव्हान; इंग्लंडच्या २ फलंदाजांना टीम इंडियानं दाखविलं पॅव्हेलियन

आज भारतीय संघास इंग्लंड संघाचा वचपा काढण्याची संधी आहे.
england team
england team saam tv

माऊंट माऊनगनुई : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) आज भारतीय (India) संघास पुन्हा एकदा गतविजेत्या इंग्लंड संघाने (England) हम किसीसे कम नहीं हे दाखवून दिले आहे. इंग्लंडच्या गाेलंदाजांनी भारतीय महिला संघास १३४ धावांतच गारद केले. (icc womens world cup latest marathi news)

आज (cricket) सकाळी खेळाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघास फलंदाजी करण्याची संधी दिली. मात्र या संधीचे भारतीय संघास साेनं करता आलं नाही. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि रिचा घोष (Richa Ghosh) यांच्याव्यतरिक्त अन्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही.

स्मृती ३५ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघातील अन्य फलंदाज ढेपाळले. इंग्लंडच्या गाेलंदाजांनी भारतीय संघास (सात बाद ८६ धावा) शंभरीतच गुंडाळण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताची यष्टीरक्षक रिचा घोष (richa ghosh) आणि गाेलंदाज झुलन गोस्वामी (jhulan goswami) यांनी संघाचा डाव सावरत धावांची शंभरी पार केली.

england team
न्यायालयीन काेठडीत चित्रा रामकृष्ण वाचणार हनुमान चालिसा; घरचं जेवण नाहीच

५० धावांची भागिदारी करणा-यांपैकी रिचा ३३ धावांवर रन आऊन झाली. तिच्या पाठाेपाठ झुलन गोस्वामी (२० धावा) बाद झाली. इंग्लंडने भारतीय संघास १३४ धावांत राेखले. इंग्लंडच्या डीनने (Charlie Dean) २३ धावांत चार गडी बाद केले.

दरम्यान १३५ धावांचे उद्दीष्ट गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या दाेन फलंदाजांना मेघना सिंग आणि झुलन गाेस्वामीने संघाच्या चार धावातंच पॅव्हेलियन दाखविल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Siddharth Latkar

england team
World Cup: ऑस्ट्रेलियाचा सलग चाैथा विजय; वेस्ट इंडिजला ७ गडी राखून नमवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com