न्यायालयीन काेठडीत चित्रा रामकृष्ण वाचणार हनुमान चालिसा; घरचं जेवण नाहीच

काही दिवसांपुर्वी चित्रा रामकृष्ण यांना अटक झाली हाेती.
Chitra Ramkrishna
Chitra Ramkrishna Saam Tv
Published On

दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी व्यस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना आज दिल्ली न्यायालयाने (delhi court) १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. (judicial custody to chitra ramkrishna)

चित्रा यांच्यावर NSE शी संबंधित गोपनीय माहिती एका आध्यात्मिक योगीसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. त्यातून त्यांना सीबीआयने नुकतीच अटक (arrest) केली हाेती.

Chitra Ramkrishna
FIH Pro League Hockey: टीम इंडियानं काढला जर्मनीचा वचपा; आता इंग्लंडविरुद्ध लढत

चित्रा रामकृष्ण यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या गुन्ह्यांत त्या एक महत्वाच्या व्यक्ती असून आणि त्यांचे परदेश दौर्‍या आणि अन्य महत्वाच्या बाबींचा तपास अजूनही सुरू आहे, असा युक्तिवाद करून सीबीआयने आज (साेमवार) त्यांना जामीन देऊ नये असे म्हटलं. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे असे अशी मागणी केली.

न्यायालयाने त्यास मंजूर देत चित्रा रामकृष्ण यांनी घरचे जेवण आणि इतर सुविधा मिळाव्यात ही मागणी फेटाळली. "प्रत्येक कैदी सारखाच असतो. त्या व्हीआयपी कैदी असू शकत नाही. नियम बदलले जाऊ शकत नाहीत असे न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी नमूद केले. त्यावर त्यांच्या वकिलांनी कारागृहात विशेष सुविधांसाठी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना हनुमान चालिसाच्या प्रार्थना पुस्तकाची प्रत बाळगण्यास परवानगी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Chitra Ramkrishna
प्रियकरासह तरुणी होती तसल्या अवस्थेत, आजीने पाहताच नातीचं क्रूर कृत्य
Chitra Ramkrishna
Pune: ४५ लाखाच्या चाेरी प्रकरणात पुणे पाेलिसांचे हात ओले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com