Angad Bumrah Video X
Sports

W, 0, 1, W, W... मैदानात बुमराहने विकेट्स घेतल्या अन् यॉर्कर किंगच्या लेकाची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video

Angad Bumrah Video : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि लेक अंगद आजचा मुंबई विरुद्ध लखनऊ हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले होते. या सामन्यादरम्यान अंगदचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Yash Shirke

MI VS LSG : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला आहे. लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय आहे. आजच्या विजयानंतर मुंबईने पॉईंट्स टेबलवर दुसरे स्थान गाठले आहे. मुंबईच्या या विजयामध्ये जसप्रीत बुमराहचे मोठे योगदान आहे. बुमराहने आज ४ विकेट्स घेतल्या.

जसप्रीत बुमराहने सुरुवातीला एडन मारक्रमला बाद केले. त्यानंतर लखनऊचे खेळाडू हळू-हळू बाद व्हायला सुरुवात झाली. शेवटच्या ओव्हर्समध्ये बुमराह पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आला. १६ व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने तब्बल ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने डेव्हिड मिलरला, पाचव्या चेंडूवर अब्दुल समदला आणि शेवटच्या, सहाव्या चेंडूवर आवेश खानला बाद केले.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगद बुमराह आजचा सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचले होते. बुमराहने १६ व्या ओव्हरमध्ये तब्बल ३ विकेट्स घेतल्यानंतर स्टेडियममधील कॅमेरा संजना आणि अंगदकडे वळला आणि त्या दोघाची रिॲक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. अंगदच्या रिॲक्शचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यामध्ये ४ विकेट्स घेत बुमराहने अनेक विक्रम मोडले. तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने १३९ इनिंग्समध्ये १७१ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांद्वारे घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमावर गेला आहे. बुमराहने ४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वेश राठी, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयंक यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT