
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना रंगला आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन हे मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.
टॉस झाल्यानंतर मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांची प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले. कर्ण शर्मा आणि कॉर्बिन बॉश यांना मुंबईने संधी दिली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लिजार्ड विलियम्स मुंबईच्या ताफ्यात होता. तो दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशला संघात घेतले होते. आज त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले.
२०२५ च्या सुरुवातीला पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेयर ड्राफ्टमध्ये कॉर्बिन बॉशचा समावेश करण्यात आला होता. बाबर आझम ज्या संघाचे नेतृत्त्व करतो, त्या पेशावर झल्मी संघासाठी कॉर्बिन बॉशची निवड झाली होती. पण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी कॉर्बिन बॉशने नकार दिला. त्याने पीएसएलऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने कॉर्बिन बॉशवर एका वर्षाची बंदी घातली आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा
(सबस्टिट्यूट प्लेयर्स - रॉबिन मिन्ज, राज अंगद बावा, जसप्रीत बुमराह, सत्यनारायण राजू, रीस टॉप्ली)
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -
एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वे सिंह राठी, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयंक यादव
(सबस्टिट्यूट प्लेयर्स - डेव्हिड मिलर, हिम्मत सिंह, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, आकाश सिंह)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.