jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: भारत- पाकिस्तान सामन्याआधी बुमराहची मैदानात एन्ट्री! विराट दिसताच मिठी मारली- VIDEO

Jasprit Bumrah In India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुबईत दाखल झाला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील हाय व्हॉल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यासाठी भारताची वेगवान गोलंदाजीची तोफ म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पंड्या देखील दुबईत दाखल झाला आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळू शकला नाही. मात्र तो भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टँड्समध्ये उपस्थित आहे.

दुखापतीमुळे झाला संघाबाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाला ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यामुळे तो शेवटच्या षटकात गोलंदाजी करु शकला नव्हता. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यानही स्थान देण्यात आलं नव्हतं. पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघातील प्रमुख फलंदाज फखर जमान बाद झाल्यानंतर त्याच्या जागी इमाम उल हकला संधी देण्यात आली आहे.

हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी बुमराह स्वत: दुबईत पोहोचला आहे. बुमराह मैदानात आला, त्यावेळी तो आयसीसीच्या ट्रॉफीसोबत फोटो शूट करताना दिसून आला. यासह त्याने विराट कोहलीलाली मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

पाकिस्तान (Playing XI): इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरीस रौफ, अब्रार अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT