भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच दिवशी ऑलआऊट झाला आहे. यामध्ये भारतीय गोलदांज बुमराहने ५ विकेट्स घेत फलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
या सामन्यात टॉस जिंकून टेम्बा बावुमाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय टीमसाठी काही फारसा चांगला ठरला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रने सर्वाधिक म्हणजेच ३१ रन्स केले.
कोलकाता टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत आफ्रिकेची मजबूत सुरुवात मोडून काढली. दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सावरत आणि वेगाने रन जमवत चांगली सुरुवात केली होती. मात्र जसप्रीत बुमराहने 11व्या ओव्हरमध्ये रायन रिक्लेटनला बोल्ड करत भारताला पहिली महत्त्वाची विकेट मिळाली.
यानंतर बुमराहने एडन मार्करमलाही बाद केलं. मार्करम बाद झाल्यावर आफ्रिकेचा स्कोर 62/2 असा झाला होता. त्यानंतर कुलदीप यादवने आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाला लेग स्लिपजवळ ध्रुव जुरेलच्या हातून कॅच आऊट करून आणखी मोठा धक्का दिला. लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 27 षटकांत 105/3 असा होता.
लंचनंतर लगेचच कुलदीप यादवने पुन्हा जादू दाखवत धोकादायक वीयान मुल्डरला LBW करून परतवून लावलं. मुल्डरच्या विकेटनंतर टोनी डी जोरजीही फार काळ टिकू शकला नाहीत. बुमराहच्या आत येणाऱ्या सुंदर बॉलवर तो 24 रन्सवर LBW झाला. यामुळे आफ्रिकेची अवस्था अधिकच नाजूक बनली.
फळी स्थिरावताना दिसत होती पण त्याचवेळी मोहम्मद सिराजने एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेत सामना पुन्हा भारताकडे झुकवला. त्यावेळी आफ्रिकेचा स्कोर 147/7 असा झाला. तर शेवटचे दोन्ही विकेच बुमराहच्या खात्यात आले. बुमराहने फक्त 27 धावांमध्ये 5 विकेट घेत तो पहिल्या दिवसाचा हिरो बनला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.