जसप्रीत बुमराह - Saam TV
Sports

Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार? समोर आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah Injury Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. यामागचं मोठं कारण जसप्रीत बुमराह असू शकतो.

कारण जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झालेला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. माध्यमातील वृत्तानुसार, त्याला घरी जाऊन विश्रांती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याला संघात घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला येणाऱ्या वर्षात बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये जावं लागेल. सूत्राने दिलेल्या माहितीत म्हटले की, ' जसप्रीत बुमराहला पुढील आठवड्यात सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये जावं लागेल. मात्र तो केव्हा जाणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्याला सूज कमी होण्यासाठी आणि मांसपेशीच्या रिकव्हरीसाठी घरीच विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.' ही भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बाब आहे.

जसप्रीत बुमराहच्या कंबरेला सूज आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याच्याबाबत कुठलीही रिस्क घेणार नाहीये. कंबरेच्या दुखण्याने त्रस्त होण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याला ही दुखापत झाली आहे. त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी होती. मात्र बीसीसीआयने अजूनही संघाची घोषणा केलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने आयसीसीकडे संघ जाहीर करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. येत्या १९ जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्यानंतर १३ फेब्रुवारीपर्यंत भारतीय संघात बदल करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

SCROLL FOR NEXT