
Jasprit Bumrah Recovery : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात जसप्रीत बुमराहच्या पाठीवर ताण आला. पाठीला सूज आल्याने त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले गेले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो मागच्या आठवड्यात भारतात परतला आहे. दुखापतीची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरच बुमराह मैदानात उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या बुमराहला घरी राहून आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहला बंगळुरुमधील आयसीसीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडे तब्येतीचा अहवाल द्यावा लागणार आहे. पण याची तारीख निश्चित नाही. पाठीतील स्नायू बरे होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठी त्याला घरी आराम करण्यास सांगितले आहे. पूर्णपणे बरा झाल्यानंतर बुमराह कधी क्रिकेट खेळणार हे ठरवले जाणार आहे.
सध्या जसप्रीत बुमराहच्या पाठीला सूज आली आहे आणि तो मैदानात खेळू शकत नाही. त्याला आधीपासूनच पाठीचा त्रास होता. बुमराहच्या दुखापतीचे निदान अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी गंभीर कारणामुळे सूज आली असावी असा अंदाज बांधला जात आहे. भारताचे माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन यांनी बुमराहच्या स्थितीवर भाष्य केले आहे.
श्रीनिवासन म्हणाले, संपूर्ण निदान केल्यानंतरच विश्रांती कधी आणि किती वेळ घ्यावी हे ठरवता येईल. सूज स्नायूवर आहे की मणक्यावर हे शोधून काढणे गरजेचे आहे. त्यावरुन उपाय करता येईल. स्नायूवर ताण आल्याने सूज येण्याची शक्यता असते. जर मणक्याला दुखापत झाली असेल तर दुखापतीतून बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी, इंग्लंड दौरा आणि आयपीएल असे भारतीय संघाचे वेळापत्रक ठरले आहे. अशात दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर असणं भारतीय संघासाठी त्रासदायक ठरु शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.