IND W vs IRE W: भारतीय महिला संघाने इतिहास रचला! ४७ वर्षांत पहिल्यांदाच केली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी

Highest Total In Womens ODI Cricket: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली आहे.
IND W vs IRE W: भारतीय महिला संघाने इतिहास रचला! ४७ वर्षांत पहिल्यांदाच केली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी
smriti mandhanatwitter
Published On

भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलेच तुटुन पडले. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गडी बाद ४३५ धावांचा बलाढ्य डोंगर उभारला. ही भारतीय महिला संघाची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारतीय संघाला इतक्या मोठ्या धावांचा डोंगर उभारला नव्हता.

IND W vs IRE W: भारतीय महिला संघाने इतिहास रचला! ४७ वर्षांत पहिल्यांदाच केली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी
IND-W vs IRE-W: सांगली एक्स्प्रेस सुसाट..Smriti Mandhana ने झळकावलं वनडेतील सर्वात वेगवान शतक

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना स्म्रिती मंधाना आणि प्रतिकाने दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी शतकी खेळी केली. प्रतिकाने १२९ चेंडूंचा सामना करत २० चौकारांच्या साहाय्याने १५४ धावांची खेळी केली. तर मंधाना १३५ धावा करत माघारी परतली.

IND W vs IRE W: भारतीय महिला संघाने इतिहास रचला! ४७ वर्षांत पहिल्यांदाच केली ही रेकॉर्डब्रेक कामगिरी
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गावसकर- इरफानने निवडला संघ; विराट- रोहितचं काय?

स्म्रिती मंधानाच्या रुपात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. ती १३५ धावा करत माघारी परतली. दोघांनी मिळून २३३ धावांची रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान स्म्रितीने ७० चेंडूंचा सामना करत वनडेतील सर्वात वेगवान शतक पूर्ण केलं. सर्वात जलद वनडे शतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये तिने हरमनप्रीत कौरला मागे सोडलं आहे. तिने ८७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

न्यूझीलंडच्या नावे सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याची नोंद

भारतीय संघाने झळकावलेली ही धावसंख्या महिला क्रिकेटमधील चौथी सर्वात मोठी धावसंख्या आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंड महिला संघाने ४ गडी बाद ४९१ धावा केल्या होत्या.

तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी देखील न्यूझीलंडचा संघ आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध ४५५ आणि आयर्लंडविरुद्ध खेळताना ४४० धावांचा डोंगर उभारला होता. आता भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ४३५ धावांचा डोंगर उभारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com