Jasprit Bumrah Mumbai Indians IPL 2025  X
Sports

Jasprit Bumrah MI : लखनऊविरुद्धच्या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सला झटका देणारी बातमी, बुमराहबाबत आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना आज एकना स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वीच जसप्रीत बुमराहच्या दुखापतीशी निगडीत नवी अपडेट समोर आली आहे.

Yash Shirke

Jasprit Bumrah MI News : वानखेडे स्टेडियमवर केकेआरचा पाडाव केल्यानंतर आज मुंबई इंडियन्स एकना स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या विरुद्ध खेळणार आहेत. अशातच जसप्रीत बुमराहच्या दुखापतीसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बुमराहचा गोलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे बुमराह लवकरच मुंबईच्या संघात सामील होईल असे म्हटले जात होते.

ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह आजच्या लखनऊ विरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार नाहीये. याशिवाय ७ एप्रिल रोजी असणाऱ्या मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्याला देखील तो मुकणार आहे. बुमराह लवकरच फिटनेस चाचण्यांच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. त्याला मैदानावर परतण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे बुमराह बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होता. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये त्याला खेळता आले नव्हते. बुमराह आयपीएल सामने देखील मुकणार असल्याचे म्हटले जात होते.

बुमराह बंगळुरू विरुद्धच्या सामन्यानंतर फिट होऊन मुंबई इंडियन्समध्ये परतू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. बुमराह दुखापतग्रस्त असल्याने मुंबई इंडियन्सचे मोठे नुकसान झाले आहे. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने बुमराहच्या जागी सत्यनारायण राजू या युवा तरुणाला संधी दिली होती. पण दोन्ही सामन्यांमध्ये चांगला खेळ करता न आल्याने मुंबईने तिसऱ्या सामन्यात अश्वनी कुमार या वेगवान गोलंदाजाला संघात सामील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

SCROLL FOR NEXT