jasprit bumrah yandex
Sports

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह रचणार इतिहास! पहिल्याच सामन्यात ४०० चा आकडा गाठण्याची संधी

Jasprit Bumrah Record In International Cricket: जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. टी -२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने श्रीलंकेचा सुपडा साफ केला.

तर वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. या मालिकेत जर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळला, तर त्याला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

जसप्रीत बुमराहला रेकॉर्ड करण्याची संधी

जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्ध खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र जर त्याला ही मालिका खेळण्याची संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० चा आकडा पार करू शकतो.

जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठण्यापासून केवळ ३ गडी दूर आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३९७ गडी बाद करण्याची नोंद आहे.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. जर बुमराहला ही मालिका खेळण्याची संधी मिळाली तर तो पहिल्याच सामन्यात हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो. बुमराहच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने टी -२० क्रिकेटमध्ये ८९ गडी बाद केले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये १५९ आणि वनडे सामन्यांमध्ये त्याने १४९ गडी बाद केले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

१)अनिल कुंबळे -९५३ गडी

२)आर अश्विन - ७४४ गडी

३) हरभजन सिंग - ७०७ गडी

४) कपिल देव - ६८७ गडी

५)जहीर खान - ५९७ गडी

६)रवींद्र जडेजा - ५६८ गडी

७) जवागल श्रीनाथ - ५५१ गडी

८) मोहम्मद शमी - ४४८ गडी

९) ईशांत शर्मा - ४३४ गडी

१०) जसप्रीत बुमराह - ३९७ गडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT