Jasprit bumrah clean bowled sunil narine on swinging yorker video viral amd2000 twitter
Sports

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं! स्विंग होणाऱ्या चेंडूवर सुनील नरेनची दांडी गुल- Video

Sunil Narine- Jasprit Bumrah: कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला.

Ankush Dhavre

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले.

पहिल्याच षटकात नुवान तुषाराने फिल सॉल्टला ६ धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघातील अनुभवी खेळाडू जसप्रीत बुमराहने घातक सुनील नरेनला आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवलं. सुनील नरेन बाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी सुरू असताना दुसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. सुनील नरेन आपला पहिलाच चेंडू खेळत होता. बुमराहने टाकलेला पहिला चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेरून निघून जाईल असं सुनील नरेनला वाटलं. त्यामुळे त्याने हा चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा अंदाज चुकला कारण बुमराहने टाकलेला चेंडू टप्पा पडताच आत आला आणि नरेनचा ऑफ स्टंप उडवून गेला. त्याला बाद केल्यानंतर बुमराहचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं.

सुनील नरेनने या हंगामात शानदार फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये ४६१ धावा चोपल्या आहेत. तो या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. यासह गोलंदाजी करताना त्याने १५ गडी बाद केले आहेत. या हंगामात पहिल्यांदाच तो गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. यापूर्वीही ७ वेळेस तो गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे.

कोलकाताचा विजय

इडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर १३९ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT