Jasprit bumrah clean bowled glenn maxwell on yorker delivery india vs australia 3rd odi watch video  twitter
Sports

IND vs AUS 3rd ODI: नाद करायचा नाय!बुमराहच्या वेगापुढे मॅक्सवेलने टेकले गुडघे, यॉर्कर चेंडू टाकत उडवल्या दांड्या, Video

Jasprit Bumrah Clean Bowled Glenn Maxwell: बुमराहने ग्ले मॅक्सवेलच्या दांड्या गुल केल्या आहेत.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Clean Bowled Glenn Maxwell:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या वनडे सामन्याचा थरार पार पडला. राजकोटच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ग्लेन मॅक्सवेलची दांडी गुल केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बुमराहने ग्लेन मॅक्सवेलची उडवली दांडी..

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. तर झाले असे की,या डावात ३९ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने यॉर्कर चेंडू टाकला.

हा चेंडू ग्लेन मॅक्सवेलला काही कळायच्या आत ऑफ स्टंप उडवून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

४ फलंदाजांनी ठोकलं अर्धशतक..

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. त्याने ८४ चेंडूंचा सामना करत ९६ धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथ ७४ धावा करत माघारी परतला. शेवटी मार्नस लाबुशेनने अर्धशतक झळकावत संघासाठी मोलाचं योगदान दिलं.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आणि प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया संघ
मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार),

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT