IND vs AUS ODI Series: मालिका जिकूंनही रोहितचं टेन्शन वाढलं! वर्ल्डकपपूर्वी घ्यावा लागणार हा मोठा निर्णय

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका जिंकूनही भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Rohit sharma and rahul dravid problems increased after suryakumar yadav and shreyas iyer came in form ind vs aus 2023
Rohit sharma and rahul dravid problems increased after suryakumar yadav and shreyas iyer came in form ind vs aus 2023saam tv
Published On

IND vs AUS ODI Series:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे.

या २ सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात, संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. आता तिसऱ्या वनडेत संघातील प्रमुख खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Rohit sharma and rahul dravid problems increased after suryakumar yadav and shreyas iyer came in form ind vs aus 2023
IND vs AUS,2nd ODI Records: सर्वात मोठी धावसंख्या ते सर्वाधिक षटकार; इंदुरच्या मैदानावर मोडले गेले हे मोठे रेकॉर्ड्स

या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. तर इंदुरच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ९९ धावांनी धुळ चारली आहे.

या दोन्ही सामन्यांमध्ये अशा खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं जे फलंदाजीत संघर्ष करताना दिसून येत आहेत. मात्र याच फलंदाजांनी फॉर्ममध्ये येऊन धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेत प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान द्यायचं? या प्रश्नाने रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची डोकेदुखी वाढली असणार आहे. (Latest sports updates)

Rohit sharma and rahul dravid problems increased after suryakumar yadav and shreyas iyer came in form ind vs aus 2023
IND vs AUS, 2nd ODI: गिल-अय्यरने झोडलं अन् राहुल-सूर्याने फोडलं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या

अय्यर की सूर्या? कोणाला मिळणार संधी?

भारतीय संघातील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही वर्षांपासून वनडे संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने धावांचा पाऊसही पाडला आहे आणि संघाला अनेकदा विजय देखील मिळवून दिला आहे.

गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्यानंतर त्याने आशिया चषकात कमबॅक केलं होतं. मात्र या स्पर्धेत त्याला हवी तशी छाप सोडता आली नव्हती. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडेत त्याने १०५ धावांची खेळी करत त्याने नंबर ४ साठी दावेदारी ठोकली आहे.

टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादवला देखील वनडे संघात संधी दिली जात आहे. या संधीचा फायदा घेत त्याने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीसह त्याने देखील संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com