ishan kishan vs sanju samson  saam tv
Sports

IND vs WI 1st ODI: ईशान किशन की संजू सॅमसन? पहिल्या वनडेसाठी रोहित कोणाला देणार संघात स्थान? पाहा कसा राहिलाय दोघांचा रेकॉर्ड

Ishan Kishan vs Sanju Samson: भारतीय संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन हे २ यष्टीरक्षक फलंदाज आहेत.

Ankush Dhavre

Ishan Kishan- Sanju Samson Record: भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये नुकताच २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला. आता हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत.

वनडे मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन हे २ यष्टीरक्षक फलंदाज आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान जाणून घ्या कसा आहे या दोघांचा रेकॉर्ड.

भारतीय संघात २ यष्टिरक्षकांचा समावेश..

वेस्टइंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात २ यष्टीरक्षक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. ज्यात ईशान किशन आणि संजू सॅमसन या खेळाडूंचा समावेश आहे. संजू सॅमसनने २०२१ मध्ये भारतीय वनडे संघासाठी पदार्पण केले होते.

मात्र हवी तशी कामगिरी करता न आल्याने त्याला संघात स्थान टिकवून ठेवता आले नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ वनडे सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या आहेत. (Sanju Samson Record)

त्याने जर वेस्टइंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली तर त्याला आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात एंट्री मिळू शकते. कारण केएल राहुल आणि रिषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. (Latest sports updates)

ईशान किशनची द्विशतकी खेळी.

ईशान किशन सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले होते. वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे सामन्यात यष्टिरक्षण करण्यासाठी ईशान किशनला प्रबळ दावेदार मानले जात आहे. ईशान किशनने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. (Ishan Kishan Record)

दोघांना मिळणार संधी?

पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांनाही संघात स्थान देऊ शकतो. संजू सॅमसनला यष्टीरक्षण करण्याची संधी दिली जाऊ शकते. यापूर्वी देखील हे दोघे मिडल ऑर्डरमध्ये एकत्र खेळताना दिसून आले आहेत.

भारतीय संघाला यावर्षी वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा मजबूत खेळाडूंचा संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

SCROLL FOR NEXT