IND vs WI ODI Series Details: कुठे, केव्हा अन् कधी रंगणार भारत-वेस्टइंडीज पहिला वनडे सामना? पाहा एकाच Click वर..

Everything about IND vs WI 1st ODI Match: ही मालिका सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या मालिकेबद्दल सर्व काही.
ind vs wi
ind vs wisaam tv
Published On

Details of IND vs WI 1st ODI Match:

भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १- ० ने विजय मिळवला आहे. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने बार्बाडोसमध्ये रंगणार आहेत. तर मालिकेतील तिसरा वनडे सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या मालिकेबद्दल सर्व काही.

ind vs wi
Team India Schedule: 5 टेस्ट, 3 वनडे अन् 8 टी -20 साठी टीम इंडिया सज्ज! BCCI ची मोठी घोषणा; इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

कुठे रंगणार भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना?

भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या केनिंगस्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. (IND vs WI ODI Series)

किती वाजता सुरू होणार भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना?

भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना कुठे पाहता येईल?

भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना पहिला वनडे सामना डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल.

ऑनलाईन कुठे पाहता येईल?

भारत - वेस्टइंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता. हा सामना तुम्ही जिओ सिनेमावर किंवा फॅन कोडवर पाहू शकता. तसेच सामन्याचे अपडेट्स तुम्ही www.saamtv.com वर मिळवू शकता. (Latest sports updates)

ind vs wi
Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची 30 व्या वर्षी अचानक निवृत्तीची घोषणा

असे आहेत दोन्ही संघ:

असा आहे भारतीय संघ (West Indies Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जड़ेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

असा आहे भारतीय संघ(Team India Squad)

शाई होप (कर्णधार), रोमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनाज, यानिक कारिया, कीसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशाने थॉमस.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com