Under 19 Star Roosh Kalaria Retirement: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.
तर त्रिनिदादच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दरम्यान ही मालिका सुरु असतानाच ३० वर्षीय क्रिकेटपटूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळताना अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवला होता. सध्या उन्मुक्त चंद युएसए संघाचे प्रतिनिधित्व करतोय. तर उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रोश कलारियाने क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने वयाच्या ३० व्या वर्षी हा निर्णय घेलता आहे.
भेदक गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकला असता, त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. २०२१ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान दिले गेले होते.
मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएलमध्ये चमकला नसला तरी रोश कलारियाचा रेकॉड प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार राहिला आहे. (Rosh Kalaria Retirement)
गुजरातचा स्टार गोलंदाज..
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील २०१८-१९ च्या हंगामात तो गुजरात संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता त्याने ८ सामन्यांमध्ये २७ गडी बाद केले होते. इतकेच नव्हे तर त्याने केरळ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक देखील घेतली होती. २०१६-१७ च्या हंगामात गुजरातने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यावेळी रोश कलारिया देखील विजेत्या संघाचा भाग होता. (Latest sports updates)
रोश कलारियाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना १७३ गडी बाद केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ४९ सामन्यांमध्ये त्याने ६७ आणि टी-२० क्रिकेटमध्ये ४९ गडी बाद केले आहेत.
रोश कलारियाने निवृत्तीची घोषणा करताच खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. जसप्रीत बुमराहने देखील स्टोरी शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.