Is Rohit Sharma Retiring from ODIs Saam TV News Marathi
Sports

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI चा नवीन प्लॅन, वर्ल्ड कपआधी होणार घोषणा

Will Shreyas Iyer be India’s next ODI captain? अय्यरने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि २०२७ विश्वचषकासाठी दीर्घकालीन नेतृत्वाची गरज असल्यामुळे त्याचे नाव चर्चेत आहे. गिलवर कसोटी संघाची जबाबदारी आधीच असल्याने त्याच्यावर अतिरिक्त दडपण न आणता अय्यरकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

Namdeo Kumbhar

  • बीसीसीआय श्रेयस अय्यरला वनडे कर्णधार करण्याचा विचार करत आहे.

  • रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे कर्णधारपद बदलाची शक्यता.

  • शुभमन गिलला सध्या कसोटी संघाची जबाबदारी असल्याने कर्णधारपद नाही.

  • २०२७ च्या विश्वचषकापर्यंत श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवण्याची शक्यता.

Shreyas Iyer to Become Team India’s Next ODI Captain? भारतीय क्रिकेट संघाचा वनडेचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून वेग आलाय. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. पण बीसीसीआय आणि निवड समितीकडून रोहित शर्माला वनडे संघातही संधी देईल की नाही, याबाबत याबाबत अनिश्चितता आहे. रोहित शर्माचा २०२७ च्या वनडे विश्वचषकापर्यंत खेळण्याचा विचार आहे, त्याने बोलूनही दाखवलेय. पण बीसीसीआयच्या मनात वेगळेच काहीतरी शिजतेय. दरम्यान, भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रेयस अय्यरकडे वनडे कर्णधारपद ?

सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय श्रेयस अय्यरला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. त्याआधी आशिया चषकासाठी शुभमन गिलला उपकर्णधारपद देऊन भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करण्याचे संकेत दिले होते. मात्र आता वनडे संघासाठी अय्यर हा वेगळा पर्याय समोर येत आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या निर्णयानंतरच अय्यरला कर्णधारपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर रोहितने निवृत्ती घेतली, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच अय्यर कर्णधारपद सांभाळू शकतो.

शुभमन गिलकडे वनडेचे कर्णधारपद का नाही?

शुभमन गिल याला तिन्ही प्रकारचा कर्णधार बनवण्याची योजना बीसीसीआयने तूर्तास बाजूला ठेवल्याचे समजतेय. शुभमन गिल याच्यावर आधीच कसोटी संघाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दडपण टाकण्याचे बोर्ड टाळत आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, बीसीसीआय श्रेयस अय्यरला २०२७ च्या विश्वचषकापर्यंत वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही.

आशिया चषकातून डावलले

आशिया कपसाठी टी-20 संघात श्रेयसला स्थान मिळाले नाही. त्यामळे सोशल मीडियावरस नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरने ५ सामन्यांत २४३ धावा केल्या होत्या. अय्यरने आतापर्यंत ७० वनडे सामन्यांत ४८ च्या सरासरीने २८४५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नोरा फतेहीसारखी फिगर बनव' ३ तास जिम अन् उपाशी ठेवलं; पतीकडून पत्नीचा अतोनात छळ

Neena Gupta: 'त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना हेवा वाटतो...' शॉर्ट्स घातल्याबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला नीना गुप्तांचं बेधडक उत्तर

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरपासून या राशींचं नशीब पालटणार; सूर्य आणि बुधाची युती करणार मालामाल

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Anagha Atul: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...

SCROLL FOR NEXT