irfan pathan's predicted squad of team india for icc t20 world cup 2024 amd2000
irfan pathan's predicted squad of team india for icc t20 world cup 2024 amd2000 twitter
क्रीडा | IPL

T20 World Cup 2024: टी- २० वर्ल्डकपसाठी माजी क्रिकेटपटूने निवडला भारतीय संघ! या १५ खेळाडूंना दिलं स्थान

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ निवडला आहे, जो संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी जाऊ शकतो. या संघात त्याने रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तर शुभमन गिलला त्याने संघात स्थान दिलेलं नाही. तर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याने विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड केली आहे.

या स्पर्धेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी मिळणार? असा पेच सुरु असताना त्याने रिषभ पंतला या संघात स्थान दिलं आहे. तर केएल राहुल आणि संजू सॅमसनला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

फिनिशर म्हणून कोण?

यष्टीरक्षकानंतर फिनिशर म्हणून कोणाला संधी मिळणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान इरफान पठाणने रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्याला या संघात स्थान दिलं आहे. त्याने शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा यांना संघात स्थान दिलेलं नाही. फिरकी गोलंदाज म्हणून त्याने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगची निवड केली आहे.

असा आहे इरफान पठाणने निवडलेला संभावित १५ सदस्यीय संघ (Irfan Pathan Picks His 15-Member Team T20 World Cup)

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे , रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि शुभमन गिल

या खेळाडूंना संघात स्थान दिलं नाही...

संजू सॅमसन, केएल राहुल, मयांक यादव, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT