Yashasvi Jaiswal Record: 'सुपरहिट'जयस्वाल! IPLमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Yashasvi Jaiswal Record In IPL: यशस्वी जयस्वालने या सामन्यात शतकी खेळी केली. दरम्यान या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
Yashasvi jaiswal creates record in ipl becomes the only batter to score 2 centuries at the age of 22 amd2000
Yashasvi jaiswal creates record in ipl becomes the only batter to score 2 centuries at the age of 22 amd2000twitter

जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळताना यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली आहे. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने शानदार विजय मिळवला. या विजयात यशस्वी जयस्वालने मोलाचं योगदान दिलं. त्याने ६० चेंडूंचा सामना करत नाबाद १०४ धावांची खेळी केली. या शतकी खेळीच्या बळावर त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

यशस्वीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद..

मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावताच यशस्वी जयस्वालने इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने हे शतक वयाच्या २३ व्या वर्षी पूर्ण केलं आहे. यासह तो २३ वर्ष पूर्ण होण्याआधी आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध १२४ धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो २१ वर्षांचा होता. आता जयपुरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळताना त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. सध्या त्याचं वय २२ वर्ष ११६ दिवस इतकं आहे.

Yashasvi jaiswal creates record in ipl becomes the only batter to score 2 centuries at the age of 22 amd2000
IPL 2024 Points Table: राजस्थानचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं; पाहा पॉईंट्स टेबल

यशस्वी जयस्वालने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दोन्ही शतकं मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झळकावली आहेत. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध २ शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. या यादीत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल अव्वल स्थानी आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ३ शतकं झळकावली आहेत. तर ख्रिस गेलने पंजाबविरुद्ध खेळताना २, विराट कोहलीने गुजरातविरुद्ध खेळताना २ आणि डेव्हिड वॉर्नरने केकेआरविरुद्ध खेळताना २ शतकं झळकावली आहेत.

Yashasvi jaiswal creates record in ipl becomes the only batter to score 2 centuries at the age of 22 amd2000
RR vs MI, IPL 2024: जयस्वालच्या 'यशस्वी' खेळीनंतर हिटमॅनकडून जादू की झप्पी! स्पेशल Video व्हायरल

राजस्थानचा शानदार विजय...

या सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने १७९ धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून हा सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com