IPL 2024 Chepauk Stadium Pitch Report 
क्रीडा

KKR Vs SRH Final: अंतिम सामन्यात ‘पिच’ ठरणार निर्णायक; चेपॉक कोणत्या संघाला देणार विजयाचं 'जॅकपॉट'?

IPL 2024 Chepauk Stadium Pitch Report : चेन्नईतील एम. एस. चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल फायनलचा थरार रंगणार आहे. ‘केकेआर’ तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे तर हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएल जिंकू शकते.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमिअर लीगचा फायनल सामना आज होणार आहे. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारी कोलकाता नाइटरायडर्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारी सनराइझर्स हैदराबादचा संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघ आज चेन्नईतील एम.एस. चिदंबरम स्टेडियममध्ये फायनल सामना खेळतील.

‘केकेआर’ तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे तर हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएल जिंकू शकते. दरम्यान हे जो कर्णधार नाणेफेक जिंकेल त्यावरून समजणार आहे. जो संघ टॉस जिंकेल तो पहिल्यांदा बॅटिंग घेईल हे स्पष्ट आहे. दरम्यान केकेआरने पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये विजय पटकावून फायनल्समध्ये प्रवेश मिळवला. तर हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये फायनलचं तिकिट मिळवलं. दरम्यान अंतिम सामना जिंकवण्यासाठी पिच महत्त्वाची भूमिका बाजवणार आहे. यामुळे चेन्नईतलं हे पिच कुणाची साथ देणार जाणून घेऊ.

खरं म्हटलं तर चिदंबरम स्टेडियमचं पिच हे गोलंदाजांसाठी अधिक चांगलं आहे. त्यातही फिरकी गोलंदाजांना हे पिच अधिक फायदेशीर आहे. येथील खेळपट्टी स्पिन फ्रेंडली असल्यामुळे बॅट्समनची थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे ज्या संघाला धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर आधी पिचवर टिकून राहावं लागेल. एकदा सेट झाल्यानंतर ते फटकेबाजी करू शकतात.

या पिचवर नेहमी गोलंदाजांचा खेळ अधिक चांगला होतो. टॉस जिंकणारा कर्णधार आधी बॅटिंग करायचा निर्णय घेईल. या सीझनमध्ये या पिचवर आठ मॅच झाल्या. पहिल्या टीमने केलेल्या रन्सचा पाठलाग करणाऱ्या टीमचा ५ मॅचमध्ये विजय झाला आहे. या स्टेडियममध्ये आत्तापर्यंत ८४ आयपीएल मॅच खेळवण्यात आलेत. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारडं येथे नेहमीच जड असतं. ४९ सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकलाय. तर दुसरी इनिंग खेळणाऱ्या टीमला ३५ वेळा विजय मिळाला आहे.

दरम्यान दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने राजस्थानला १७६ धावांचे टार्गेट दिलं होत. पण तेही गाठणं शक्य झालं नाही. राजस्थानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यात हैदराबादच्या दोन फिरकीपटूंनी राजस्थानच्या टीमला रोखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या इनिंगपर्यंत विकेट स्लो होत असते. त्यामुळे अशा वेळी फिरकी गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT