ipl auction twitter
क्रीडा

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कारण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान हे ऑक्शन केव्हा होणार अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

तर माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणारं ऑक्शन हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. या ऑक्शनची घोषणा होण्यापूर्वी, किती खेळाडूंना रिटेन करता येणार याबाबतची माहिती समोर येईल.

आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने मेगा ऑक्शनची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे ऑक्शन होऊ शकते. यासह लवकरच किती खेळाडू रिटेन करता येणार याबाबत माहिती दिली जणार आहे.

मेगा ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार?

मेगा ऑक्शनची तारीख आणि ठिकाण अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, आगामी मेगा ऑक्शन यावेळी भारतात न होता, परदेशात आयोजित केले जाऊ शकते. गेल्या वर्षी आयपीएलचा लिलाव दुबईत पार पडला होता. यावेळीही हा सोहळा परदेशात आयोजित केला जाऊ शकतो.

आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सर्व संघात स्टार खेळाडूंची भरमार आहे. त्यामुळे कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला बाहेर करायचं हा प्रश्न संघमालक आणि टीम मॅनेजमेंटला सतावणार यात काहीच शंका नाही.

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. गेली १० वर्षे रोहितने मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं. ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT