UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

UPI Scam: यूपीआयच्या माध्यमातून स्कॅम केला जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील आधीच सावधान व्हा आणि या टिप्स फॉलो करा...
UPI Scam
UPI ScamSocial Media
Published on
UPI Scam
UPI ScamSocial Media

UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने भारतात डिजिटल पेमेंट खूप सोपे केले आहे. UPI च्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवरून पेमेंट करू शकता.

UPI Scam
UPI ScamSocial Media

UPI पेमेंट मोठ्या मॉल्समध्ये आणि अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्येही वापरले जाते.

UPI Scam
UPI ScamSocial Media

हल्ली UPI पेमेंटचा गैरफायदा काही लोकं घेत आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी UPI वापरून लोकांचे पैसे चोरण्यास सुरुवात केली आहे.

UPI Scam
UPI ScamSocial Media

UPI घोटाळ्यात फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या बँक अकाऊंटची डिटेल्स, UPI पिन, OTP याची माहिती मिळवून तुमच्या अकाऊंटमधील पैसे काढून घेतात.

UPI Scam
UPI ScamSocial Media

लोकांना फोन करून सांगितले जाते की त्यांनी लकी ड्रॉ जिंकला आहे आणि त्यांना हजारो रुपये मिळतील. त्यानंतर युजरला UPI पिन देण्यास सांगितले जाते जेणेकरून पैसे ट्रान्सफर करता येतील. पण पिन उघड होताच त्या व्यक्तीची फसवणूक होते.

UPI Scam
UPI ScamSocial Media

लोकांना त्यांच्या अकाऊंटमध्ये भरपूर पैसे आल्याचा मेसेज मिळतो. मग कोणीतरी फोन करून चुकून पैसे पाठवल्याचे सांगतात आणि पैसे परत पाठवायला सांगतात.

UPI Scam
UPI ScamSocial Media

जर तुमच्यासोबत असे झाले तर सर्वात आधी पैसे प्रत्यक्षात आले आहेत की नाही हे तपासावे. हा स्कॅम असू शकतो.

UPI Scam
UPI ScamSocial Media

फसवणूक करणारे बनावट UPI ॲप्स तयार करत आहेत. या ॲप्समध्ये तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता आणि पेमेंट झाल्याचे दिसून येईल. पण हा घोटाळा आहे. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे नेहमी तपासा.

UPI Scam
UPI ScamSocial Media

जेव्हा तुम्ही UPI वापरत असाल तेव्हा तुम्ही किती पैसे पाठवत आहात आणि ते योग्य व्यक्तीला जात आहे की नाही हे तपासा. तुमच्या बँक अकाऊंटची डिटेल्स, पिन किंवा ओटीपी हे कोणालाही शेअर करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com