Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

Bharat Gogavale: शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा चांगलाच हिरमोड झालाय. गोगावले यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?
Bharat Gogavale
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आलीय. मात्र यामुळे गोगावलेंचं या सरकारमधलं मंत्रिपद मात्र हुकलंय. यामुळे राज्यभर गाजलेला गोगावलेंचा कोट वॉर्डरोबमध्येच राहणार आहे.गोगावलेंच्या शिवून ठेवलेल्या कोटाच्या कहाणीवरचा हा विशेष रिपोर्ट.

शिंदे गटातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भरत गोगावलेंना पुन्हा एकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिलीय. भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी बोळवण करण्यात आलीय. मात्र मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या गोगावलेंनी आता मंत्रिपद मिळालं तरी स्वीकारणार नसल्याचं म्हटल्यानं त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?
Mla Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट करतंय वेळकाढूपणा, ठाकरे गटाचा मुंबई हायकोर्टात नवा अर्ज

भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र आधी शिंदे गटातील नेत्यांमुळे आणि त्यानंतर अजित पवारांच्या एण्ट्रीने भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाच्या संधीवर विरजण पडलं..त्यातच कट्टर विरोधक असलेल्या आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळाल्याने गोगावले आणखीच अस्वस्थ झाले. त्यानंतर मला मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल पण तटकरेंना रायगडचं पालकमंत्रिपद नको, अशी भूमिका गोगावलेंनी घेतली.

त्यामुळे तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रिपदापासून वंचित रहावं लागलं. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात आपला नंबर लागण्याची आशा असलेल्या गोगावलेंनी कोट शिवल्याचंही सांगितलं होतं. हाच शिवलेला कोट विरोधकांच्या टिंगल टवाळीचा विषय बनला होता. मात्र आता गोगावलेंना मंत्रिपद न देता त्यांची एसटी महामंडळावर वर्णी लावण्यात आलीय.

कोट शिवून मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या भरत गोगावलेंची अखेरपर्यंत मंत्रिपदी वर्णी लागली नाही..त्यामुळे राज्यात मोठा चर्चेचा विषय ठरलेला त्यांचा शिवून ठेवलेला कोट आता ते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून घालतात की निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास पुन्हा मंत्रिपदाची आशा बाळगून सांभाळून कपाटात ठेवतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com