IPL 2027: Rinku Singh May Become Kkr's New Captain saam tv
Sports

IPL 2027: रिंकू सिंग बनू शकतो नवा कर्णधार? KKRच्या संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Rinku Singh : आयपीएल २०२७ मध्ये रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) नवा कर्णधार बनू शकतो. इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांनी त्याला सर्वोत्तम पर्याय असल्याचे सुचवलंय.

Bharat Jadhav

  • कोलकाता नाईट रायडर्स नव्या कर्णधाराच्या शोधात

  • अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर संघासमोर नेतृत्वाचा प्रश्न

  • रिंकू सिंगचे नाव कर्णधारपदासाठी संभाव्य पर्याय म्हणून चर्चेत

२०२७ च्या आयपीएल हंगामाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा विजेतेपद पटकावणारा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर फ्रँचायझीसमोर कॅप्टन कोणाला करायचं असा प्रश्न पडलाय. आगामी हंगामात संघाचे नेतृत्व कोण करणार? १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या मिनी-लिलावादरम्यान केकेआर (KKR) संघ कर्णधारपदासाठी संभाव्य पर्यायांवरही लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.

याचदरम्यान भारतीय संघाचे माजी अष्टपैलू इरफान पठाणने केकेआरचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो? याबाबत भाकित केलंय.आयपीएल २०२७ साठी रिंकू सिंग हा केकेआर संघाच नवा कर्णधार होऊ शकतो. त्याच्यासह माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अनुभवी समालोचक आकाश चोप्रा यांनीही रिंकूच्या नेतृत्वाचे समर्थन केलंय.

रिंकू सिंग हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे

जिओस्टार (JioStar) शी बोलताना इरफान पठाण म्हणाला, "केकेआर (KKR) चा कर्णधार म्हणून रिंकू सिंगला नियुक्त करण्याबाबत बरीच चर्चा सुरूय. सध्या संघाकडे नेतृत्वासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत, रिंकू हा सर्वोत्तम पर्याय आहे. इरफानने पुढे असेही म्हटलं की, एखादी फ्रँचायझी लिलावाद्वारे संघात सामील करून घेतलेल्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. यासंदर्भात त्याने वेस्ट इंडीजच्या शाई होपचे नाव या भूमिकेसाठी एक संभाव्य उमेदवार म्हणून सुचवलंय.

फ्रँचायझी लिलावाद्वारे कर्णधार मिळवण्याचाही विचार करू शकतात. जर असे झाले, तर केवळ एकाच खेळाडूचे नाव समोर येते, ते म्हणजे शाई होप. त्याने नुकतीच भारतांविरुद्धची मालिका खेळली होती. त्यात चांगली कामगिरी केली होती." "केकेआर (KKR) या पर्यायाचा विचार करू शकते, परंतु ज्या पद्धतीने संघाचे व्यवस्थापन काम करते, ते पाहता मला वाटते की रिंकूच नवा कर्णधार बनेल."

भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनीही कर्णधारपदासाठी रिंकू सिंगच्या नाव सुचवलंय. रिंकू मागील हंगामात फ्रँचायझीचा उपकर्णधार होता, असं चोप्रा म्हणालाय. यासह आकाश चोप्रा यांनी सुनील नरेनचाही एक संभाव्य पर्याय म्हणून उल्लेख केलाय. "जर केकेआरने रिंकू सिंगला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला, तर तो त्यांच्याकडे उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय असेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; आगामी निवडणुकीचा प्लान ठरला

Rajasthan Elections : 'स्थानिक' निवडणुकांचे निकाल धक्कादायक! 418 पैकी 258 जागांवर काँग्रेसचा वरचष्मा, भाजपला किती जागा?

डिलिमिटेशनमुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? महाराष्ट्रात किती जागा वाढतील?

Maharashtra News Live Update: हातणी–सैलानी–दुधा महामार्गावर घाटनांद्रा गावाजवळ भीषण अपघात

सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका? खाद्यपदार्थांसह पेट्रोल-डिझेलही महागणार? सरकारने दिला मोठा इशारा

SCROLL FOR NEXT