Rajasthan Elections : 'स्थानिक' निवडणुकांचे निकाल धक्कादायक! 418 पैकी 258 जागांवर काँग्रेसचा वरचष्मा, भाजपला किती जागा?

Rajasthan Panchayat Samiti Deputy Chairman Election: राजस्थान पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश मिळवले आहे. 418 जागांपैकी काँग्रेसने 257, तर भाजपने 91 जागांवर विजय मिळवला.
Rajasthan Panchayat Election
Rajasthan Panchayat Electionsaam tv
Published On: 

राजस्थानमधील सभापती निवडणुकीनंतर आता उपसभापती निवडणुकीतही काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले आहे. राज्यातील एकूण 419 पंचायत समितीपैकी 418 जागांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कॉँग्रेसने 257 ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदावर कब्जा केला आहे. तर भाजपला 91 ठिकाणी समाधानी राहावे लागले आहे.

Rajasthan Panchayat Election
डिलिमिटेशनमुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? महाराष्ट्रात किती जागा वाढतील?

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (RLP) ३४, भारत आदिवासी पक्षाने (BAP) १० आणि माकपने ३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच 23 पंचायत समित्यांमध्ये अपक्ष उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आले आहेत. भाजपने उदयपूर, पाली आणि डिग येथे उपसभापती पदावर कमळाचा झेंडा फडकवला आहे. तर जैसलमेर, राजसमंद आणि सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसची कामगिरी उत्तम राहिली आहे.

Rajasthan Panchayat Election
सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका? खाद्यपदार्थांसह पेट्रोल-डिझेलही महागणार? सरकारने दिला मोठा इशारा

उदयपूर जिल्हा (एकूण १९ पंचायत समित्या): याठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवत १३ जागांवर विजय मिळवला आहे त्यातील २ बिनविरोध आहे. काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले, तर १ जागा अपक्षाकडे गेली आहे.

टोंक जिल्हा (एकूण ८ पंचायत समित्या): येथे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ८ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ एका जागेवर टोडारायसिंग - बिनविरोध विजय मिळवता आला.

Rajasthan Panchayat Election
प्रशासनात मोठा भूकंप! 12 IPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कोणत्या जिल्हयात नियुक्ती?

तसेच जैसलमेर, राजसमंद आणि सवाई माधोपूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे, तर पाली आणि डीग जिल्ह्यांत भाजपने ही जागा कायम ठेवली आहे. एका पंचायत समितीचा निकाल अजून लागलेला नाहीये. सदर आकडेवारी ही संध्याकाळी 8 वाजे पर्यंतची असून काही पंचायत समितीचा निकाल अजून लागलेला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.