IPL 2026 winner prize money and runner-up reward details saam tv
Sports

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

IPL Winner Prize Money 2026: आयपीएल २०२६ च्या विजेतेपदासाठी आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. महाअंतिम सामन्यापूर्वी विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल, हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • आयपीएल 2026 चा अंतिम सामना RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार

  • आरसीबी सलग दुसरे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने खेळणार

  • क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता या हायव्होल्टेज अंतिम सामन्याकडे लागले आहे.

आयपीएल २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. शुभमन गिल कर्णधार म्हणून आपली पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुजरात संघाने २०२२ मध्ये हार्दिकच्या कर्णधारपदाखाली आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने गेल्या वर्षी आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. (IPL 2026 Winner Prize Money: How Much Will The Champions And Runner-up Earn?)

त्यामुळे सलग दुसऱ्यांदा कप आपल्या नावावर करण्याचा निश्चयाने आरसीबी गुजरातशी भिडणार आहे. गेला दीड दोन महिन्यापासून चालू असणाऱ्या आयपीएलचा अंतिम सामना आज होतोय. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल आणि पराभूत संघाला किती मिळेल, हे माहितीये का? नाही ना? तेच जाणून घेऊ.

आयपीएल २०२६ च्या विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएलच्या पहिल्या हंगामात, राजस्थान रॉयल्सला विजेतेपद पटकावल्याबद्दल ₹४.८ कोटी (४८ दशलक्ष रुपये) मिळाले होते. आज, विजेत्याच्या बक्षीस रकमेत पाचपट वाढ झालीय. आयपीएल २०२६ चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला ₹२० कोटी रुपये मिळतील.

उपविजेत्या संघासाठी बक्षीस रक्कम किती आहे?

आयपीएल २०२६ चा अंतिम सामना हरणाऱ्या संघालाही कोट्यवधी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कम १३ कोटी रुपये आहे. यासह प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या इतर दोन संघांनाही बक्षीस रक्कम मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोहोचला, त्यामुळे त्यांना ७ कोटी रुपये मिळतील, तर सनरायझर्स हैदराबादला ६.५ कोटी रुपये मिळतील.

दरम्यान आरसीबीचा खेळाडू फिल सॉल्ट मैदानात उतरणार की नाही याची अनिश्चितता असली तरी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्या जागी व्यंकटेश अय्यर विराट कोहलीसोबत सलामीला येऊ शकतो. त्याला मर्यादित संधी मिळाल्या असल्या तरी अनेकवेळा छान खेळी करत एक भक्कम सुरुवात करून दिली आहे. गुजरात टायटन्स आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे. आज दोन्ही संघ त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

SCROLL FOR NEXT