यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस वाढत चाललाय. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज, मंगळवारी लढत होणार आहे. हा सामना दोन गुणांसाठी नाही, तर कोलकाता आणि लखनऊसाठी वर्चस्वाचा असणार आहे. ऐतिहासिक इडन गार्डन्सवर हे दोन्ही तगडे संघ भिडणार आहेत. या दोन्ही संघांत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लखनऊच्या अडचणी कायम, कॅप्टन फ्लॉप
लखनऊच्या अडचणी कायम आहेत. कारण कर्णधार रिषभ पंतची बॅट अद्याप हवी तशी तळपलेली नाही. रिषभ पंत हा महागडा खेळाडू आहेच, शिवाय त्याच्यावर संघाच्या फलंदाजीची भिस्त आहे. पण तो सध्या फॉर्मात नाही. त्यामुळं मधल्या फळीवर दबाव वाढत आहे. आजच्या सामन्यात रिषभ पंतची आक्रमक खेळी बघायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. याशिवाय चांगली सांघिक कामगिरी करून विजय मिळवणं आवश्यक आहे.
कोण पडणार कुणावर भारी?
आयपीएलमध्ये कोलकाता आणि लखनऊ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. लखनऊने यापैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स दोनदा विजयी ठरला आहे. विशेष म्हणजे इडन गार्डन्समध्ये दोघे दोनदा भिडले आहेत. दोघांनी एकेक सामना जिंकला आहे. यामध्ये लखनऊचं पारडं जड मानलं जात असलं तरी, इडन गार्डन्सवर कोलकाताही वरचढ आहे. त्यामुळं रहाणेच्या संघाला कमी लेखून चालणार नाही.
मागील सामन्यांत दोन्ही संघांची कामगिरी
कोलकाताची मागील लढत हैदराबादसोबत झाली होती. त्यात हैदराबादला ८० धावांनी धूळ चारली होती. व्यंकटेश अय्यरने ६० धावांची तडाखेबंद खेळी करून संघाला तारलं होतं. तर गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली होती. सांघिक कामगिरीमुळं हैदराबाद संघाला पराभवाची धूळ चारता आली होती. दुसरीकडे लखनऊने मुंबई इंडियन्सला रोमहर्षक लढतीत १२ धावांनी पराभूत केलं होतं. मिशेल मार्शने ६० धावांची तुफानी खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती.
कोण बाजी मारणार?
आघाडीच्या फलंदाजांवर लखनऊ संघाची भिस्त आहे. या फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. जर आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर, मधल्या फळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कोलकाताची चिंता काही प्रमाणात मिटलेली आहे. कारण मागील सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंह यांनी जबरदस्त खेळी केली. तळातही फलंदाज असल्यामुळं कोलकाता संघ वरचढ दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.