shreyas iyer Angry umpire over drs call in SRH and PBKS match video viral Saam Tv News
Sports

VIDEO : मी काय माश्या मारतोय का? चालू मॅचमध्ये कर्णधारालाच इग्नोराय नम:, श्रेयसनं DRSच्या निर्णयावरुन अंपायरला झापलं

Shreyas Iyer Angry Video Viral : सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीदरम्यान पाचव्या षटकात ही घटना घडली. पॉवरप्लेमध्ये ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता.

Prashant Patil

SRH vs PBKS 2025 : आयपीएलच्या १८वा सिजनमध्ये काल शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्जचा संघ आमने सामने आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने २४५ धावांचा डोंगर उभारला आणि हैद्राबादसमोर २४६ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. दरम्यान, पंजाब किंग्जचे आव्हान सनरायजर्स हैद्राबादने ९ चेंडू शिल्लक ठेऊन गाठलं. अभिषेक शर्माच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर हैद्राबादने हा दिमाखदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा १४२ तर ट्रेविस हेडने ६६ धावांची दमदार खेळी करत हैद्राबादला विजय मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात एक गोष्ट घडली, ज्याने पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर चालू सामन्यात भडकलेला दिसला.

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीदरम्यान पाचव्या षटकात ही घटना घडली. पॉवरप्लेमध्ये ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, चेंडू हेडच्या लेग साईडमधून निघत किपरच्या ग्लोव्हजमध्ये गेला. त्यामुळे किपर आणि गोलंदाज दोघांनीही फलंदाज आऊट असल्याचं अपील केलं. पंचांनी लगेच मागे वळून पाहिले आणि तिसऱ्या पंचाला डीआरएसचा (DRS) इशारा दिला. पण या कृतीने मात्र श्रेयस अय्यर रागाने लालबुंद झालेला दिसला.

नियम काय सांगतो?

नियम सांगतो की डीआरएस (DRS) घ्यायचा की नाही हे कर्णधार ठरवतो आणि पंचांनाही त्यांच्या निर्णयानंतर डीआरएसचा निर्णय स्वीकारावा लागतो. पण कदाचित यावेळी तसं झालं नाही, म्हणून खेळपट्टीकडे येत असताना श्रेयस अय्यरने पंचांवर ओरडून त्याला विचारण्यास सांगितलं. यादरम्यान, अय्यर रागावलेला दिसत होता, जरी नंतर त्याने स्वतः डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तरी तो असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की, मी आहे ना इथे, मला एकदा विचारा. त्याच्या या हावभावावरुन तो संतापलेला दिसला. दरम्यान, डीआरएस घेतल्यानंतर फलंदाज मात्र नाबाद राहिला.

ट्रॅव्हिस हेडने ३७ चेंडूत ६६ धावांची दिमाखदार खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ९ चौकार लगावले. हेडने अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT