चेन्नई : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने एकूण १८२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना सीएसके संघाला फक्त १५९ धावा करता आल्या. CSKचा हा सलग तिसरा पराभव होता. काही चाहते पराभवासाठी धोनीला जबाबदार धरत आहेत. सामन्यानंतर, सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) म्हणाला की, 'गेले काही सामने त्याच्यासाठी चांगले गेले नाहीत आणि पॉवरप्ले त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे.
सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, 'गेले काही सामने आमच्यासाठी खराब गेले आहेत. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण सामन्यातील परिस्थिती आमच्या बाजूने जात नाहीये. निश्चितच पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स गमावल्या. पॉवरप्लेमध्ये आमची गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ते घडत नाहीये. मला वाटते की पॉवरप्लेमध्ये कोण गोलंदाजी करत आहे, याबद्दल आम्ही थोडे जास्त चिंतित आहोत किंवा अनिश्चित आहोत'. (CSK vs DC IPL 2025)
गायकवाड पुढे म्हणाले, 'आम्हाला सर्व गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. या चार सामन्यात पॉवरप्लेमध्ये आम्ही नेहमीच खराब कामगिरी करत आलो आहे. आम्ही खूप मागे होतो आणि आमच्याकडे फक्त एक फलंदाज बाकी होता. DCने चांगली गोलंदाजी केली आणि परिस्थितीचा खरोखर चांगला वापर केला. शिवम दुबे फलंदाजी करत असतानाही, आम्ही लय मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते होऊ शकले नाही', असंही गायकवाड म्हणाला.
दरम्यान, सामन्याच्या ११व्या षटकात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) फलंदाजीला आला. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. यानंतरही तो २६ चेंडूत फक्त ३० धावा करू शकला. ९ षटके क्रीजवर राहूनही धोनीने फक्त एक चौकार आणि एक षटकार मारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.