Royal Challengers Bengaluru in Final IPL 2025 Saam Tv News
Sports

PBKS vs RCB Qualifier 1 IPL 2025 : आरसीबीची पंजाब मोहीम फत्ते, श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा 'फ्लॉप शो'; चौथ्यांदा फायनलमध्ये...

Royal Challengers Bengaluru in Final IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये एक शानदार कामगिरी करत क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली.

Prashant Patil

Punjab Kings vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये एक शानदार कामगिरी करत क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा आरसीबी पहिला संघ बनला आहे. ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला आहे. आरसीबी कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आणि संपूर्ण संघ फक्त १०१ धावांवर बाद झाला. आरसीबीने १० षटकांत हे लक्ष्य सहज गाठलं.

चौथ्यांदा अंतिम फेरीत...

आरसीबी संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी संघाने २००९, २०११ आणि २०१६चे आयपीएल फायनल खेळले होते, परंतु तिन्हीमध्ये संघाचा पराभव झाला. आता आरसीबी संघ ९ वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि यामुळे हा संघ विजेतेपद जिंकू शकेल अशी सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. चालू हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही घाई दाखवली नाही. विराट कोहली १२ धावा तर मयंक अग्रवाल १९ धावा करून बाद झाला. पण फिल सॉल्टने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबचे सर्व गोलंदाज मोठे अपयशी ठरले. सॉल्टने सामन्यात ५६ धावांची खेळी खेळली. कर्णधार पाटीदारने षटकार मारून संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. त्याने एकूण १५ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT