RCB VS CSK IPL 2025 X
Sports

CSK ला हरवलं तरीही RCB ला मिळणार नाही प्लेऑफचं तिकीट; १६ गुण मिळाले तरी फायदा नाही, कसं आहे क्वालिफायचं गणित?

RCB VS CSK IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आरसीबीने १६ गुण मिळवले, तरीही त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळणार नाही.

Yash Shirke

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2025 मधला ५२ वा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्याच्या बेतात आहे. आजच्या सामन्यात जर आरसीबीने २ गुण मिळवले, तर त्यांच्या खात्यात १४ गुण जमा होतील. १४ गुण मिळवूनही बंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करता यणार नाही, पण का? चला जाणून घेऊयात...

मुंबई इंडियन्स टेबल टॉपर्स आहेत, तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानी आहे. पॉईंट्स टेबलवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात बंगळुरूचा विजय, तर ३ सामन्यात पराजय झाला आहे. बंगळुरूच्या खात्यामध्ये आता १४ गुण आहेत.

आज चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध चेन्नई हा सामना खेळला जाईल. या सामन्यात जर बंगळुरूचा पराभव झाला, तर प्लेऑफच्या स्पर्धेतील त्यांच्या आव्हानावर परिणाम होईल. पण जर हा सामना बंगळुरूने जिंकला, तर ते १६ गुणांसह टेबल टॉपर्स बनतील. पण १६ गुण मिळवून देखील ते आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकणार नाही. कारण बंगळुरू व्यतिरिक्त आणखी ६ संघ असे आहेत, जे १६ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकतात.

IPL 2025 च्या लीग स्टेजमध्ये आता ७ संघ आहेत, जे १६ पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात. तर दुसऱ्या बाजूला ५ असे संघ आहेत, जे २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवू शकतात. ज्या संघाचे सर्वप्रथम २० गुण होतील आणि ज्याचा नेट रन रेट इतर चार संघांपेक्षा चांगला असेल, त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. त्यामुळे आज सामना जिंकून १६ गुण मिळवूनही आरसीबी आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT