rajasthan royals ipl 2025 X
Sports

'बीसीसीआयची भ्रष्टाचार विरोधी संस्था आता...'; राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप, BCCI ने थेट स्पष्टीकरण देत विषयच संपवला

IPL 2025 : राजस्थान रॉयल्स या संघाने आयपीएल २०२५ मध्ये खराब कामगिरी केली आहे. राजस्थानने सलग चार सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. अशातच त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले आहेत.

Yash Shirke

IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा खराब फॉर्म सुरु आहे. राजस्थानच्या संघाने सलग ४ सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलवर हा संघ आठव्या स्थानी आहे. आयपीएल २०२५ मधील ८ पैकी २ सामन्यांमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघाच्या विरुद्ध खेळताना राजस्थानच्या हातातला विजय निसटला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. त्यात राजस्थानचा पराभव झाला. लखनऊ विरुद्धचा सामना राजस्थानने फक्त २ धावांनी गमावला. या एकूण पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप करण्यात आले. राजस्थान क्रिकेट असोसिएशन अँड हॉक कमेटीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी लखनऊ विरुद्ध राजस्थान हा सामना फिक्स होता असे आरोप केला होता. या आरोपांवर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या संबंधित माहिती दिली. या अधिकाऱ्याने मॅच फिक्सिंगचे आरोप निरर्थक असल्याचे म्हटले. 'राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी खोटी विधाने केली जात आहेत. मॅच फिक्सिंगचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. बीसीसीआयची भ्रष्टाचार विरोधी संस्था प्रत्येक सामन्यावर सतत लक्ष ठेवत असते' असे अधिकाऱ्याने म्हटले.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मध्ये ८ सामने खेळले आहेत. यातील ६ सामने त्यांनी गमावले आहेत. सलग, सतत पराभव होत असल्याने प्लेऑफमध्ये जाण्याचे राजस्थानचे आव्हान लवकरच संपुष्टात येईल असे काहीजण म्हणत आहेत. त्यात कर्णधार संजू सॅमसन देखील दुखापतग्रस्त झाल्याने राजस्थानच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

RO-RO Service : 'या' कारणामुळे कोकण रेल्वेची रो-रो सेवा चाकरमान्यांसाठी 'निरुपयोगी'? | VIDEO

Pune Water : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा कधी कुठे येणार पाणी

UPI Charges: आता फुकटात यूपीआय पेमेंट बंद, पैसे मोजावे लागणार; RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

Karjat Tourism : पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाताय? कर्जतमधील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT