shreyas iyer shashank singh x (twitter)
Sports

IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

GT Vs PBKS Live Match : गुजरात विरुद्ध पंजाब या सामन्यात श्रेयस अय्यरचे शतक फक्त ३ धावांनी हुकले. संधी असतानाही शशांक सिंहने अय्यरला स्ट्राईक दिली नाही. अय्यरसोबत त्याने असे का केले? जाणून घ्या..

Yash Shirke

GT Vs PBKS Live : पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना सध्या अहमदाबादमध्ये सुरु आहे. या सामन्यामध्ये पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने वादळी ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाब किंग्सने २४३ धावा केल्या. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरला शतक ठोकण्याची संधी होती. पण शशांक सिंहने स्ट्राईक न दिल्याने त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले.

पहिल्या इनिंगच्या शेवटची ओव्हर टाकायला मोहम्मद सिराज आला. त्याच्या पहिल्या बॉलवर शशांक सिंहने जोरदार चौकार मारला. त्यानंतर त्याने दोन धावा काढल्या. संपूर्ण ओव्हरमध्ये शशांककडे स्ट्राईक होती. शशांकने श्रेयसला स्ट्राईक न दिल्याने त्याला शतक पूर्ण करता आले नाही. यामुळे श्रेयसच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली.

श्रेयसला स्ट्राईक का दिली नाही याचे स्पष्टीकरण शशांक सिंहने इनिंग संपल्यावर दिले. तो म्हणाला, १९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलच्या वेळीच श्रेयस अय्यरने मला समजावले होते. माझ्या शतकाची तू काळजी करु नकोस. तू तुझे शॉर्ट्स मारुन खेळ. मी आनंदी आहे. श्रेयसचे ऐकून शशांकने देखील तुफानी खेळ केला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने ४, २, ४, ४, वाइड, ४, ४ अशा एकूण २२ धावा केल्या.

गुजरातची प्लेईंग ११ -

शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

पंजाबची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

Maharashtra Live News Update: रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ | VIDEO

Leopard: बिबट्यांची संख्या 1200 वर; राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार?

Silver Rate: दिवाळीच्या पहिल्या दिवशी चांदीच्या दरवाढीला ब्रेक; ४००० रुपयांची घसरण; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT