IPL 2025MI Vs Delhi saam tv
Sports

IPL 2025 MI Vs Delhi Capitals: 'आम्हाला वाटलं आम्ही जिंकलो, पण...; पराभव झाल्यानंतर कर्णधार 'बापू' फलंदाजांवर संतापले

IPL 2025MI Vs Delhi: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये मुंबई आण दिल्ली संघ आमनेसामने आले होते, या सामन्यात मुंबईने दिल्लीचा १२ धावांनी पराभव केला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. दिल्लीच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावत मुंबईच्या धावफलकावर मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. मुंबईने २० षटकांमध्ये २०५ धावा केल्या. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र दिल्लीच्या नाकीनऊ आले आणि संपूर्ण संघ १९ षटकात १९३ धावा करून बाद झाला. सलग ५ विजयांनंतर दिल्लीला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील हा दुसरा विजय होता. या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने फलंदाजांना सुनावलं. नेहमीच खालच्या क्रमावरील फलंदाज उत्कृष्ट खेळ करून तुम्हाला विजय मिळवून देतील असं नेहमी होऊ शकत नाही. त्यामुळे वरच्या क्रमवारीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं अपेक्षित असल्याचं अक्षर पटेल म्हणाला.

सामना झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला पराभवाचे कारण विचारण्यात आले, त्यावर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, आम्हाला वाटलं की, आम्ही जिंकून गेलो, परंतु फलंदाजांनी खूप खराब फटके मारले, त्यामुळे सर्व बाद झाले. तेच पराभवाचं कारण ठरलं. एक षटक शिल्लक असताना आम्ही १२ धावांनी हरलो पण आम्ही जिंकू शकलो असतो.

खालच्या फळीतील फलंदाज नेहमीच तुम्हाला वाचवतील हे शक्य नसतं. कधीकधी तुम्हाला चुकीचा शॉट खेळावा लागतो, त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही.”

"मला वाटतं २०५ धावांचे लक्ष्य चांगले होते कारण खेळपट्टी चांगली होती आणि दवही होते. कदाचित जर आम्ही चांगले झेल घेतले असते तर आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकलो असतो. मला माझ्या तिन्ही फिरकी गोलंदाजांवर विश्वास आहे आणि तिघेही पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करू शकतात.

कुलदीप या हंगामात शानदार गोलंदाजी करत आहे. जेव्हा जेव्हा मला विकेटची गरज असेल तेव्हा तो विकेट मिळवून देत असतो. मला वाटतं आज खूप सकारात्मक गोष्टी होत्या, आता आपण हा सामना विसरून जायला हवा, असं कर्णधार अक्षर पटेल आपल्या मुलाखतीच्या शेवटी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT