ipl auction twitter
Sports

IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार?मोठी अपडेट आली समोर

IPL 2025 Auctions Date And Venue: आयपीएल २०२५ स्पर्धेचं ऑक्शन केव्हा आणि कुठे होणार, जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2025 Auction Date And Venue: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल ऑक्शनची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सर्व संघांना ६ खेळाडू रिटेन करता येणार आहेत. ज्यात जास्तीत जास्त ४ कॅप्ड आणि २ अन्कॅप्ड खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान हे ऑक्शन केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

केव्हा आणि कुठे होणार आयपीएल ऑक्शन?

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणारे ऑक्शन सौदीतील जेद्दा किंवा रियादमध्ये होऊ शकते. यापूर्वी असा अंदाज व्यक्त केला जात होता की, या स्पर्धेसाठीचे ऑक्शन लंडन, दुबई, सिंगापूर किंवा विएनामध्ये होऊ शकते. मात्र आता अशी चर्चा सुरू आहे की, हे ऑक्शन जेद्दा किंवा रियादमध्ये केले जाऊ शकते.

माध्यमातील वृत्तानुसार, हे ऑक्शन भारतात आयोजित केले जाणार होते. मात्र बीसीसीआयला हवं तसं लोकेशन मिळत नसल्याने हे ऑक्शन भारताबाहेर आयोजित केले जाऊ शकते. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

केव्हा होणार ऑक्शन?

हे ऑक्शन केव्हा होणार? याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहेत. माध्यमातील वृत्तानुसार हे ऑक्शन २५ -२६ नोव्हेंबर रोजी आयोजित केले जाऊ शकते. या कालावधीत भारतीय संघ बॉर्डर गावसकर मालिका खेळण्यात व्यस्त असणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ ते २६ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. त्यामुळे ऑक्शनची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

स्टार खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

सर्व संघांमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. नव्या नियमानुसार, प्रत्येक संघाला ६ खेळाडू रिटेन करता येणार आहेत. ज्यात ५ कॅप्ड आणि १ अन्कॅप्ड खेळाडूचा समावेश असू शकतो. त्यामुळे कोणाला रिटेन करायचं आणि कोणाला जाऊ द्यायचं असा प्रश्न संघमालकांसमोर असणार आहे. दरम्यान आपल्याला हवा असेल तो खेळाडू संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT