Sunrisers Hyderabad IPL 2025 Hotel Fire x
Sports

IPL 2025 दरम्यान मोठी दुर्घटना, SRH खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलला आग, काव्या मारनची टीम अडकली पण...

Sunrisers Hyderabad IPL 2025 : हैदराबादच्या बंजारा हिल्स या ठिकाणी असलेल्या पार्क हयात या आलिशान हॉटेलला आग लागली. या हॉटेलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघातील खेळाडू यांचा मुक्काम होता.

Yash Shirke

IPL 2025 ची सर्वत्र धामधुम पाहायाला मिळत आहे. देशभरातल्या विविध स्टेड़ियमवर आयपीएलचे सामने होत आहेत. सामने खेळण्यासाठी सर्व १० संघ ठिकठिकाणी दौरे करत असतात. त्यामुळे संघाचा मुक्काम स्टेडियमजवळील आलिशान हॉटेल्समध्ये असतो. सनरायजर्स हैदराबादचा संघ सध्या हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या हॉटेलमध्ये आहे. दरम्यान या आलिशान हॉटेलमध्ये आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पार्क हयात हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि त्यामुळे हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये धुराचे लोट पसरले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सनरायजर्स हैदराबाद संघातील खेळाडूंसह इतर नागरिकांनादेखील हॉटेलमधून तातडीने बाहेर काढण्यात आले.

१४ एप्रिल म्हणजेच आज सकाळी ८.५० च्या सुमारास ही घटना घडली. या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे हैदराबाद जिल्हा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हॉटेलमध्ये पर्यटक, खास पाहुण्यांसह सनरायजर्स हैदराबाद संघातील खेळाडू देखील मुक्काला होते. त्यामुळे सुरुवातीलाच सर्वांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले.

पहिल्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे लोट पसरु लागले. त्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. खबरदारी म्हणून तेथील परिसर रिकामा करण्यात आला. पार्क हयात हॉटेलमध्ये आग का लागली याचा शोध सुरु आहे. प्राथमिक अहवालांनुसार, ही आग पहिल्या मजल्यावरील विद्युत वायरिंगमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT