
DC VS MI : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यामध्ये करुण नायरला दिल्लीकडून खेळायची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत करुण नायरने दमदार कामगिरी केली. त्याने मुंबईचा हुकमी इक्का असलेल्या जसप्रीत बुमराहची अक्षरक्ष: धुलाई केली. याच दरम्यान बुमराह आणि करुण नायर यांच्यात भर मैदानात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
फाफ डू प्लेसिस दुखापतग्रस्त असल्याने जेक फ्रेजर-मॅकगर्कच्या अभिषेक पोरेलला सलामीला पाठवण्यात आले. जेक फ्रेजर-मॅकगर्क पहिल्याच बॉलवर आउट झाला. त्यानंतर करुण नायर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करायला मैदानामध्ये उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत मोठ-मोठे फटके मारायला सुरुवात केली. त्याने सगळ्यात जास्त धावा जसप्रीत बुमराहच्या ओव्हरमध्ये काढल्या.
करुण नायरने ४० बॉल्समध्ये ८९ धावा केल्या. २२२.५० च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने ५ षटकार आणि १२ चौकार मारले. पण सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहसोबत त्याचा वाद झाला. बुमराहच्या ओव्हरमध्ये करुण नायरने शॉट मारला. धाव काढण्यासाठी पळत असताना करुण नायरचा जसप्रीत बुमराहला धक्का लागला. काहीजण बुमराह मुद्दाम करुणच्या मध्ये उभा असल्याचेही म्हणत आहेत. पण या धक्का लागल्याने बुमराह आणि नायर यांच्यात भर सामन्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर टाइम आउटच्या वेळी बुमराह करुण नायरला काहीतरी म्हणाला. आपली बाजू मांडण्यासाठी नायर पुढे आला. त्याने हार्दिक पंड्याला देखील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रोहित शर्मा घडलेल्या प्रकारावर हसताना दिसला.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -
अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.