Manasvi Choudhary
हाताचे कोपर काळे पडल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
हाताच्या कोपरचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि प्रभावी उपाय करू शकता
लिंबाच्या फोडीवर साखर टाकून ती कोपरांवर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने चोळा यामुळे डेड स्किन निघून जाते.
बेकिंग सोड्यात थोडे दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि काळ्या कोपरवर लावा आणि १० मिनिटांनी धुवा यामुळे त्वचा स्वच्छ होते.
कोरफड जेल आणि दही समप्रमाणात एकत्र करा. हे मिश्रण कोपरांवर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोपरांना खोबरेल तेलाने ५ मिनिटे मसाज करा.
बटाट्याची एक चकती कापून ती कोपरांवर घासा किंवा बटाट्याचा रस लावून १५ मिनिटे ठेवा.