RCB Vs PBKS IPL Final 2025 X
Sports

RCB की PBKS, कोण बनणार IPL 2025 चे चॅम्पियन? AI ने केली मोठी भविष्यवाणी

RCB Vs PBKS IPL Final 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या अंतिम सामन्यात कोणता संघ जिंकणार असा प्रश्न ३ एआय प्लॅटफॉर्म्संना विचारण्यात आला. तिन्हीही प्लॅटफॉर्म्संनी एकच नाव घेतले. ते नाव कोणते? जाणून घ्या....

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. फायनल मॅच कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स फायनल सामन्यात कोण बाजी मारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत एआयला प्रश्न विचारण्यात आला. एआय प्लॅटफॉर्म - ग्रोक, जेमिनी आणि चॅटजीपीटी यांनी आयपीएल २०२५ च्या चॅम्पियनबाबत भविष्यवाणी केली. तिन्ही प्लॅटफॉर्म्सनी एकच संघ निवडला तो संघ कोणता? चला जाणून घेऊयात...

Gemini -

आयपीएलची पहिलीच ट्रॉफी जिंकण्यासाठी बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघ उत्सुक आहेत. दोन्ही संघांना ट्रॉफी जिंकायची आहे. बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघांनी सीझनमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. पण जर निवड करायचीच असेल, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलची ट्रॉफी जिंकेल असे जेमिनीने म्हटले आहे.

ChatGPT -

चॅटजीपीटीने देखील आयपीएल फायनल सामन्याविषयी भविष्यवाणी केली आहे. आरसीबीचा सातत्यपूर्ण फॉर्म पाहता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच आयपीएलचे विजेतेपद पटकावणार असे चॅटजीपीटीने म्हटले आहे. पण पंजाब किंग्सचे अलीकडच्या सामन्यातील कामगिरी आणि श्रेयस अय्यरचे नेतृत्त्व कौशल्य पाहता आरसीबीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते अशी शक्यता चॅटजीपीटीने व्यक्त केली आहे.

X GROK -

एक्सच्या ग्रोक प्लॅटफॉर्मने यंदा 'इ साल कप नाम दे होणार' अशी भविष्यवाणी केली आहे. आयपीएल २०२५ मधील डेटावरुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पारडे जड असल्याचा दावा ग्रोकने केला आहे. पंजाब किंग्सकडे उपविजेतेपद जाईल असे ग्रोकने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT