Virat Kohli Crying Video x
Sports

RCB ने ट्रॉफी जिंकली! सामना संपण्यापूर्वीच विराटचा उर भरुन आला, मैदानातच ढसाढसा रडला किंग कोहली

Virat Kohli Crying Video : आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफी जिंकली. सामन्यासंपण्याआधी आणि संपल्यानंतर विराट कोहली मैदानात रडताना दिसला.

Yash Shirke

RCB WIN IPL 2025 : रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकली आहे. दुसऱ्या इनिंगच्या शेवटी सामना बंगळुरूच्या बाजूने फिरला. त्यानंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय निश्चित झाला. शेवटचे काही चेंडू बाकी असताना विराट कोहली भर मैदानात रडू लागला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बंगळुरूचा फायनलमधील विजय निश्चित झाल्याने विराटला अश्रू अनावर झाले. सामना संपल्यानंतर तो एबी डिव्हिलियर्सला मिठी मारुन रडू लागला.

आजचा अंतिम सामना पाहण्यासाठी एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारखे आरसीबीचे अनेक माजी खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजर होते. सामना जिंकल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीला घट्ट मिठी मारली. दोघेही रडू लागले. एबीनंतर गेल देखील विराटला मिठ्ठी मारण्यासाठी पुढे आला. आरसीबीच्या खेळाडूंमध्ये विजयाचा आनंद पाहायला मिळाला.

२००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा आयपीएलमध्ये सहभागी होत आला आहे. तीनदा फायनलमध्ये प्रवेश करुनही बंगळुरूला यश मिळत नव्हते. आता २०२५ मध्ये बंगळुरूने ट्रॉफी जिंकली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टेडियमवर विराट कोहली आणि आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळाला.

१९१ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब किंग्सचा संघ मैदानात उतरला. त्यांची सुरुवात चांगली झाली. पण एका लागोपाठ विकेट्स पडल्याने पंजाबची गाडी मध्ये अडकली. पंजाबच्या शिलेदारांनी लढत दिली. पण बंगळुरूचे गोलंदाज वरचढ ठरले. शेवटच्या ओव्हर्समध्ये शशांक सिंहने सामना पंजाबला जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT