RCB Vs PBKS IPL 2025 Final x
Sports

RCB Fans Viral Videos : कुठे लिंबू-मिरची, तर कुठे होम हवन, RCB च्या विजयासाठी चाहत्यांचा अनोखा अंदाज; पण तरीही...

RCB Vs PBKS IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. आता त्यांच्याकडे ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. आरसीबीला ट्रॉफी मिळावी यासाठी चाहचे देवाकडे प्रार्थना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. बंगळुरूचा संघ चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. याआधी आरसीबीचा संघ तीन वेळा फायनलमध्ये गेला होता. पण तिन्हीही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता आजचा सामना जिंकण्यासाठी बंगळुरूचे खेळाडू सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फॅन फॉलोइंग मोठी आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरसीबीला २० मिलियनपेक्षा जास्त चाहते फॉलो करतात. आरसीबीबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. बंगळुरूने यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. यादरम्यान आरसीबीच्या चाहत्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकावी यासाठी चाहत्यांनी होम-हवनचे आयोजन केले. आरसीबी एकदातरी जिंकू दे यासाठी चाहते प्रार्थना देखील केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणखी एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आरसीबीला नजर लागू नये यासाठी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या चाहत्याने स्वत:च्या कारवर लिंबू-मिरच्या लावून सजावट केली. कारच्या काचेवर 'बिल्कुल रिक्स नही लेने का' असा मजकूर लावल्याचे पाहायला मिळाले.

२००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचा भाग आहे. अठरा वर्ष क्रिकेट लीगमध्ये खेळून देखील बंगळुरूच्या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आरसीबीने तीन वेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांना फायनल सामन्यात त्यांना एकदाही यश मिळाले नाही. या वर्षी तरी आरसीबीने ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT