Mahendra Singh Dhoni on IPL Retirement Saam Tv News
Sports

Mahendra Singh Dhoni : मी जरी निवृत्ती घेतली तरी...; CSK vs MI सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान

Mahendra Singh Dhoni on IPL Retirement : चेन्नई सुपर किंग्स हा एक बलाढ्य संघ आहे. पण प्रत्येक ८-१० वर्षांनी प्रत्येक संघ बदलत असतो, तसं चेन्नईचं आहे. मी जरी निवृत्ती घेतली तरी याच संघातून घेईल.

Prashant Patil

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीग (IPl) 2025 ची सुरुवात जोरदार झालीय. त्याचवेळी सीएसकेचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना हवा देण्यात आली. आता धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा पुन्हा पसरवण्यात आल्या आहेत. आज चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यावेळी धोनी याने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. जोपर्यंत त्याची खेळण्याची इच्छा आहे, तो CSKसाठी खेळत राहील, अशी खुशखबर त्याने दिली यावेळी दिलीय.

जिओ हॉटस्टारवर धोनीने एक मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला की, माझी जोपर्यंत खेळण्याची इच्छा आहे, तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळत राहील. ही माझी फ्रेंचाईज आहे. जर मी व्हीलचेअरवर असेल तरी, ते मला ओढत नेतील, असं धोनी म्हणाला. धोनी आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. त्याने आयपीएलच्या विश्वात पाचवेळा विजय मिळवून दिला आहे. धोनीच्या नेतृत्वात CSK ने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०१३ मध्ये त्याने हे विजय मिळवले आहेत. त्यानंतर त्याने २०२४च्या हंगामापूर्वी कर्णधार पद सोडले, आणि ऋतुराज गायकवाड याला कर्णधार केलं.

चेन्नई सुपर किंग्स हा एक बलाढ्य संघ आहे. पण प्रत्येक ८-१० वर्षांनी प्रत्येक संघ बदलत असतो, तसं चेन्नईचं आहे. हा संघ माझ्यासाठी सर्वस्व आहे. चेन्नईच्या संघानेही मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे जोपर्यंत मला खेळायचं असेल तोपर्यंत ते नक्कीच मला संधी देत राहतील. याबद्दल मी त्यांचे आभार मानायला हवे. पण या सर्व गोष्टींमध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, ही आयपीएलमधील माझी अखेरची फ्रँचायझी असणार आहे. यानंतर मी कोणत्याही संघाशी संलग्न राहणार नाही. त्यामुळे मी जरी निवृत्ती घेतली तर ती मी चेन्नई सुपर किंग्स या संघामधूनच घेईन आणि त्यानंतर आयीएलमध्ये कुठल्याही संघाकडून खेळणार नाही. महेंद्रसिंग धोनीने यावेळी मुंबईच्या सामन्यापूर्वी निवृत्तीबाबत हे महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT