IPL 2025 Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders KKR Win by 8 Wickets Saam Tv News
Sports

CSK vs KKR IPL 2025 : घरच्याच मैदानात शिकार झाली! संघाची धुरा सांभाळूनही धोनीचे शेर KKR समोर ढेर; पॉइंट टेबलमध्ये तळाशी

CSK vs KKR IPL 2025 : IPL२०२५चा २५वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. हा सामना चिदंबरम स्टेडियमवर रंगला. हा सामना केकेआरच्या संघाने जिंकला आहे.

Prashant Patil

चेन्नई : महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून आला, पण आयपीएल २०२५च्या २५व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. ज्यामुळे आपल्याच घरच्या मैदानावर चेन्नईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चेन्नईला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी गेला आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने ६ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांना आणखी ८ सामने खेळायचे आहेत. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान ७ सामने जिंकावे लागतील. जे आता अवघड दिसत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे.

या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुनील नरेनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि सीएसकेला २० षटकांत नऊ गडी गमावून १०३ धावांवर रोखलं. सीएसकेकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा काढल्या, त्याने २९ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार मारले आणि ३१ धावा केल्या. केकेआरकडून नरेनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, मोईन अली आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT