Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Controversy over Dhoni out or not out  Saam Tv News
Sports

धोनी OUT की NOT OUT? तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात, नेमकं काय घडलं?

MS Dhoni Out Or Not Out CSK vs KKR IPL 2025 : धोनीही फलंदाजीने संघाला काहीही योगदान देऊ शकला नाही. तो स्वस्तात बाद झाला. पण, तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Prashant Patil

चेन्नई : आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कर्णधार म्हणून एमएस धोनीने पुनरागमन केले. आज शुक्रवारी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यासह धोनी सुमारे ६८३ दिवसांनी कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये परतला. या हंगामात सलग ५ पैकी ४ सामने गमावलेल्या चेन्नईला आशा होती की, धोनीचे कर्णधार म्हणून पुनरागमन संघात नवीन ऊर्जा आणेल आणि खेळाडूंचा उत्साह वाढवेल. परंतु तसं झालं नाही आणि पुन्हा एकदा संघाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. यावेळी धोनीही फलंदाजीने संघाला काहीही योगदान देऊ शकला नाही. तो स्वस्तात बाद झाला. पण, तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १५व्या षटकात फक्त ७२ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत, धोनी पुन्हा एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चाहत्यांना अपेक्षा होती की धोनी काही मोठे फटके मारून संघाला सन्माजनक धावा करुन देईल. पण तोही पुढच्याच षटकात आऊट झाला. पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज सुनील नारायणने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. १६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीच्या विरोधात पायचीत अपील करण्यात आलं, ज्यावर पंचांनी त्याला आऊट घोषित केलं.

धोनीने लगेच डीआरएस घेतला आणि येथूनच संपूर्ण वादाला सुरुवात झाली. जेव्हा तिसऱ्या पंचांनी निर्णय घेण्यासाठी स्निकोमीटरची मदत घेतली. तेव्हा असं दिसून आलं की जेव्हा चेंडू धोनीच्या बॅटजवळ होता तेव्हा स्निकोमीटरवर काही हालचाल दिसून आली. यामुळे धोनीला काहीसा दिलासा मिळाला आणि तो आऊट होणार नाही असं वाटलं होतं. पण पंचांनी चेंडू बॅटला लागला नाही, असं सांगताच सर्वांना आश्चर्य वाटलं. यानंतर, बॉल ट्रॅकिंगमध्ये हे स्पष्ट झालं की चेंडू स्टंपला लागला होता आणि म्हणूनच त्याला आऊट देण्यात आले. ४ चेंडू खेळल्यानंतर धोनी फक्त ४ धाव करू शकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT