आयपीएल २०२५ मध्ये तुम्ही 'रोबोट डॉग' पाहिला असेलच. हा रोबोट डॉग आयपीएलचं आकर्षण केंद्र बनलाय. रोबोट डॉग नाणेफेकच्या वेळी मैदानावर कर्णधारांसोबत दिसतो. खेळाडू या रोबोट डॉगसोबत मस्ती देखील करताना दिसतात. पण या रोबोट डॉगमुळे बीसीसीआयला कोर्टाची पायरी चढावी लागलीय. नेमकं काय प्रकरण आहे, हेव जाणून घेऊ.
त्याच झालं असं, मैदानात कर्णधारांसोबत दिसणारा हा रोबोट डॉगचे नाव 'चंपक' (चंपक रोबोट डॉग) ठेवण्यात आले आहे. पण त्याच्या या नावामुळे बीसीसीआयला उच्च न्यायालयाकडून नोटीस मिळालीय. 'चंपक' हे दिल्ली प्रेस पेपरद्वारे प्रकाशित होणारे बाल मासिक आहे. या प्रकाशनाने दिल्ली उच्च न्यायालयात बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केलीय. रोबोट कुत्र्याचे नाव 'चंपक' ठेवण्यावरून प्रश्न उपस्थित झालेत.
दिल्ली प्रेसनं आरोप केलाय की, बीसीसीआयने रोबोट डॉगचं नाव चंपक ठेवल्यानं त्यांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचं उल्लंघन झालंय. यावर, न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या खटल्यावर नोटीस बजावण्यात आलीय. यावर पुढील सुनावणी ९ जुलै रोजी न्यायालयात होणार आहे. दिल्ली प्रेसची बाजू मांडणारे वकील अमित गुप्ता म्हणाले की, बार अॅण्ड बेंचने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं की, या एआय उपकरणाचं नाव चंपक ठेवण्यात आलं होतं.
सध्या आयपीएल चालू आहे, मैदानात हा रोबोट डॉग येत असतो. या उपकरणाला आधी सादर करण्यात आलंय. पंरतु त्याचे नाव २३ रोजी चाहत्यांच्या वोटिंगनंतर ठेवण्यात आले आहे.
आमचं मासिक हे प्राण्यांच्या पात्रांसाठी ओळखलं जातं. आपण उत्पादन वेगळे जरी मानलं तरीही त्याचा वापर नुकसानकारक आहे. त्यामुळे ट्रेडमार्क कमकूवत करणारे आहे." उत्पादनाची जाहिरात आणि विपणन हे व्यावसायिक शोषण दर्शविण्यासाठी पुरेसं आहे, असा युक्तीवाद गुप्ता यांनी केला आहे. "आयपीएल हा एक व्यावसायिक उपक्रम आहे,"असेही ते म्हणाले.
दरम्यान या प्रकरणात विराट कोहलीचं नाव आलंय. त्यामागे कारण ठरलं विराटचं नीकनेम. विराट कोहलीला चिकू म्हटलं जातं. चिकू देखील त्यांच्या मासिकातील पात्र आहे. त्यामुळे कोहलीच्या टोपणनावावरून रॉयल्टी देखील मिळवता येईल.परंतु क्रिकेटर कोणतेच उत्पादन करत नाहीये, असं गुप्ता म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.