IPL 2024 Rinku Singh : केकेआर संघानं रिलीज केलं तर कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल याचं उत्तर स्वतः रिंकूनं दिलं आहे.  Social media
क्रीडा

IPL 2024 : रिंकू सिंह कोणत्या संघातून खेळणार? त्यानं स्वतः असं उत्तर दिलं की सगळ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज रिंकू सिंह यापुढे आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत क्रिकेट जगतात मोठी उत्सुकता आहे. कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएल मेगा ऑक्शनच्या आधी रिलीज केलं तर, त्याला कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल याबाबत रोखठोक उत्तर दिलंय. याशिवाय यामागचं कारणही त्यानं उघड केलं आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) यावर्षीच्या अखेरीला होणाऱ्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये रिलीज केलं तर, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाकडून खेळायची इच्छा रिंकू सिंहने व्यक्त केली आहे. रिंकूने २०१८ मध्ये केकेआरकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल २०२३ मध्ये रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं होतं.

रिंकूनं सांगितलं कारण

स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत रिंकूला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रिंकूने आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्या संघात विराट कोहली (Virat Kohli) आहे. यावेळी त्याला टीम इंडियाच्या टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दलही विचारण्यात आलं. तर त्यावर तो खूप चांगला कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मी खेळलो आहे. तो तर खूपच शांत आणि जास्त बोलत नाही. तो खूपच चांगला कर्णधार आहे, असं रिंकू म्हणाला.

रिंकूचा पुढचा प्लान काय?

रिंकू सिंह टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतीय संघात राखीव म्हणून सहभागी होता. पण त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. यानंतर तो झिम्बाब्वेच्या विरुद्ध पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत खेळला. सूर्यकुमारच्या नेतृत्वात श्रीलंकाविरुद्धच्या टी २० मालिकेतही तो खेळला. आता रिंकू यूपी टी २० लीगमध्ये दिसणार आहे मेरठ मावेरिक्स संघाचं तो नेतृत्व करणार आहे. २५ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होतेय. याच दिवशी तो त्याचा पहिला सामना असणार आहे. या स्पर्धेत त्याची धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT