आयपीएल २०२५ स्पर्धेत अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. गेल्या २ हंगामापासून या स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम लागू केल्यामुळे अनेकांनी टीका देखील केली आहे. आता आयपीएल २०२५ स्पर्धेची चर्चा सुरू असताना, बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाच्या भविष्यावर भाष्य केलं आहे.
जय शहा यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत बोलताना त्याचे फायदे आणि तोटेही सांगितले. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळणं कठीण आहे. मात्र याच नियमामुळे आणखी एका भारतीय खेळाडूला जागा मिळते. याचा फायदा म्हणजे त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, असं जय शहा म्हणाले.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जय शहा म्हणाले की, ' नुकताच आमची आयपीएल फ्रेंचायझींच्या मालकांशी चर्चा झाली. या बैठकीत इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबतही चर्चा करण्यात आली. या नियमाचे फायदे आणि तोटेही आहेत. या नियमाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना जास्त संधी मिळत नाही. तर फायदा असा की, एका भारतीय खेळाडूला स्वतः ला सिद्ध करण्याची संधी मिळते. ब्रॉडकास्टर्स यावर भरपूर खर्च करत आहेत. मात्र एक प्रशासक म्हणून माझ्यासाठी खेळ जास्त महत्वाचा आहे. आम्ही लवकरच याबाबत निर्णय घेऊ.'
इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फायदा दोन्ही संघांना होतो. या नियमानुसार दोन्ही संघांना अतिरिक्त १-१ खेळाडू खेळवण्याची संधी मिळते. फलंदाजाची गरज असल्यास फलंदाजाचा संघात समावेश केला जातो. तर गोलदाजाची गरज असल्यास गोलंदाजाला संघात संधी दिली जाते. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंना स्थान मिळणं कठीण झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.